शिवप्रहार न्युज - अरे बाबो... श्री शनि शिंगणापूर देवस्थानला सव्वाचार लाखाला फसवले...

शिवप्रहार न्युज - अरे बाबो... श्री शनि शिंगणापूर देवस्थानला सव्वाचार लाखाला फसवले...

अरे बाबो... श्री शनि शिंगणापूर देवस्थानला सव्वाचार लाखाला फसवले...

नेवासा (शिवप्रहार न्यूज)- संपूर्ण हिंदुस्तानात प्रसिद्ध असलेले भाविकांचे श्रद्धास्थान नेवासा तालुक्यातील श्री शनिशिंगणापूर देवस्थानला एका भामट्याने तब्बल ४ लाख २८ हजाराला फसविण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे श्रीशनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त समिती व त्या व्यक्तीला काम देणारे यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे श्री शनि देवालाच फसवल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. 

   याप्रकरणी अधिक माहिती अशी की, श्री शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये योगेश नानासाहेब वाबळे वय-३५ धंदा-नोकरी राहणार- वडगाव गुप्ता, तालुका.नगर यांनी फिर्यादी दिल्यावरून आरोपी जगदीश भट राहणार- उसगाव पोंडा, राज्य.गोवा या आरोपीविरुद्ध भादवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत वाबळे या तरुणाने म्हटले आहे की, श्री शनैश्वर देवस्थानचे दीपस्तंभावर ब्रांझ व गोल्ड प्लेटिंग चा कलश बसवण्यासाठी ४ लाख २८ हजारांचा चेक व आरटीजीएस द्वारे देऊन सुद्धा कळसाचे काम अद्याप पर्यंत अप्रामाणिकपणे पूर्ण केलेले नाही. व आरोपीने फिर्यादी व विश्वस्त प्रशासकीय अधिकारी श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर यांचा विश्वास भरोसा संपादन करून फसवणूक विश्वासघात केला असल्याचे म्हटले आहे.

    याप्रकरणी एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.कर्पे, सफौ.सप्तर्षी हे गोव्यातील आरोपी जगदीश भट याचा शोध घेत आहे. श्री शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेलाच फसविल्याने शनिशिंगणापूर मध्ये विश्वस्त व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली असून महाराष्ट्रातील कलाकुसरचे काम करणारे कारागीर सोडून गोव्यातील हा जगदीश भट कोणी शोधला ? त्याला कोणाच्या शिफारशीने काम देण्यात आले ? याची चर्चा आता श्री शनिशिंगणापूर, सोनई परिसरात होत आहे.