शिवप्रहार न्युज - गोतस्करांवर धडाकेबाज कारवाई करणाऱ्या एसपी ओलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव करावा !

शिवप्रहार न्युज -  गोतस्करांवर धडाकेबाज कारवाई करणाऱ्या एसपी ओलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव करावा !

गोतस्करांवर धडाकेबाज कारवाई करणाऱ्या एसपी ओलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव करावा !

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात गोतस्करांवर धडाकेबाज शेकडो कारवाया करत हजारो गोवंश जनावरांचे प्राण वाचविले.नगर जिल्ह्याच्या पोलीस कामगिरीच्या इतिहासात हा एक मोठा कारवाईचा धडाका झाला असून या बद्दल मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंन्दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसपी राकेश ओला यांचा गोरक्षक अधिकारी म्हणून विशेष गौरव करावा अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने केली आहे.कारण अहिल्यानगर जिल्ह्यातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या भागांत गोवंश जणावरांच्या मांसाची कायदा पायदळी तुडवत तस्करी होत होती.मात्र एसपी राकेश ओला यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून ते आज अखेर संगमनेर, अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगांव, पाथर्डी , ममदापूर, राहाता, कोपरगांव, पुणतांबा, पारनेरसह जिल्ह्याच्या बहुतेक भागात गोवंश जणावरांची कत्तल करून मांस विक्री व तस्करी केली जायची या विरुद्ध एसपी राकेश ओला यांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोमांस तस्करांवर धडाकेबाज शेकडो कारवाया झाल्या. हजारो किलो गोमांस पकडण्यात आले. तर शेकडो आरोंपीवर गुन्हे दाखल झाले. हजारो गाय, वासरू, बैल यांचे प्राण वाचले. 

         संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात ज्यादा कारवाया अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झाल्या आहेत. तेव्हा शासनाचा गोवंश हत्या बंदीचा कायदा मोडणाऱ्यांनी एसपी ओला यांचा धसका घेतला. ही मोठी कामगीरी झाली. तसेच संवेदनशील असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूका सुरळीत पार पडल्या तीसुद्धा जिल्हा पोलीसांची कामगीरी एसपी ओलांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद ठरली. आता त्यांची मुंबई येथे बदली झाल्याने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गोरक्षक म्हणून त्यांचा गौरव करावा. आता मुंबईत गोमांस घेवून जाणाऱ्यांचाही बंदोबस्त होईल अशी आशा आहे.दरम्यान एसपी राकेश ओला यांना थेट मुंबईत पोलीस उपआयुक्त म्हणून बढती बदली दिल्याने गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिल्याचे मानले जात आहे.