शिवप्रहार न्यूज - मास्क का घातला नाही असे विचारल्याने श्रीरामपुरात पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

शिवप्रहार न्यूज - मास्क का घातला नाही असे विचारल्याने श्रीरामपुरात पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

मास्क का घातला नाही असे विचारल्याने श्रीरामपुरात पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार श्री.रघुनाथ खेडकर, वय 53 वर्ष हे काल शुक्रवार 02 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत असताना तेथे असलेले सोमनाथ भाऊराव कुदळे राहणार -अशोक नगर फाटा व बाळासाहेब निवृत्ती घोडे राहणार -महांकाळ वाडगाव यांना खेडकर यांनी मास्क का घातले नाही असे विचारले. 

        या विचारण्याचा राग आल्याने सोमनाथ कुदळे याने हवालदार खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले.तसेच बाळासाहेब घोडके याने देखील वाईट शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात नाव घेऊन नोकरी घालवतो अशी धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा आणला. 

        म्हणून पोलीस हवालदार श्री.खेडकर यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 436/2021 भादवि कलम 353 वगैरे प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा काल रात्री उशिराने दाखल करण्यात आला आहे.

        या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ आरोपी कुदळे व घोडे यांना अटक केली असून त्यांना आज शनिवारी न्यायालयाच्या समोर रिमांड कामी हजर करण्यात येणार आहे.