शिवप्रहार न्यूज- एखाद्या लहान मुलीची-मुलाची श्रीरामपुर शहरातील बिबट्याने शिकार केल्यावर वनविभाग पिंजरा लावणार का ?

शिवप्रहार न्यूज- एखाद्या लहान मुलीची-मुलाची श्रीरामपुर शहरातील बिबट्याने शिकार केल्यावर वनविभाग पिंजरा लावणार का ?

एखाद्या लहान मुलीची-मुलाची श्रीरामपुर शहरातील बिबट्याने शिकार केल्यावर वनविभाग पिंजरा लावणार का ?

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या आरटीओ कार्यालयाच्या शेजारील यादव वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले आहे. 

       मागच्याच आठवड्यात या बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला घरातून उचलून नेऊन हल्ला करून त्याची शिकार केली होती.या घटनेनंतरही वन विभागाने अथवा प्रशासनाने या बिबट्यासाठी पिंजरा लावलेला नाही. 

             यावरून वन विभागाला लोकांच्या जीवाची पर्वा नाही का ? असा सवाल या भागात राहणारे संतप्त नागरिक करीत आहेत. उद्या बिबट्याने एखाद्या लहान मुलाला अथवा मुलीला घरातून उचलून नेऊन त्याची शिकार केल्यावर वन खाते जागे होणार का ? असाही सवाल स्थानिक नागरिक व नेतेमंडळी यांनी केला आहे.

        जर लवकरात लवकर पिंजरा लावला नाही तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.