शिवप्रहार न्यूज- ऑनलाईन रेमडेसीवीर विकणार्या विरोधात भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र दिलीप गांधी यांनी केला नगर सायबर सेलला गुन्हा दाखल....

ऑनलाईन रेमडेसीवीर विकणार्या विरोधात भाजपाचे माजी नगरसेवक सुवेंद्र दिलीप गांधी यांनी केला नगर सायबर सेलला गुन्हा दाखल....
नगर-भाजपाचे दिवंगत नेते दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र दिलीप गांधी ,वय-३९,रा-आनंदधाम समोर,नगर यांनी ॲानलाईन रेमडेसीवीर विकणार्या मो.क्र.८११००५३५५८ हा मोबाईल बाळगणार्या आरोपीच्या विरोधात नागरिकांची फसवणुक करीत आहे म्हणुन सायबर सेल पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०५/२०२१ प्रमाणे भादंवि कलम ४२० व आय टी ॲक्ट कलम ६६ खाली गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत सुवेंद्र गांधी यांनी नमुद केले की,रेमडेसीवीर हे औषध ऑनलाईन विक्री करण्यास मनाई असतांना कोरोना पेशंटसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन दोन ते तीन तासात उपलब्ध करुन देतो असा मेसेज आरोपीने पाठवुन आरोपीच्या बॅंक ॲाफ महाराष्ट्र अकाऊंट मध्ये पैसे टाकण्यास सांगुन माझी आणि नागरिकांची फसवणुक केली म्हणुन तक्रार करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नगर सायबर सेल चे पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.