शिवप्रहार न्युज - भरदिवसा १५ तोळे चोरी ! टाकळीभान येथे खळबळ!! 

शिवप्रहार न्युज -  भरदिवसा १५ तोळे चोरी ! टाकळीभान येथे खळबळ!! 

भरदिवसा १५ तोळे चोरी ! टाकळीभान येथे खळबळ!! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात राहणारे धनंजय धुमाळ यांच्या घरी आज बुधवारी दुपारी २ - ३० च्या सुमारास घरात घुसून घरातील कपाट कटावनीने तोडून उघडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख ०३ हजार असा सुमारे १५ लाखाचा ऐवज चोरून नेला. धक्कादायक बाब म्हणजे घरातील तीन जण पुढच्या खोलीत पाहुण्यांशी बोलत असतांना मागच्या घरात घुसुन भरदिवसा ही धाडशी चोरी झाली.

       दरम्यान शिवप्रहार न्युजने श्री. धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता दोन - ते तिन चोरटे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.तसेच तालुका पोलिस स्टेशनचे पोनि चौधरी पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले . दरम्यान कोकणे यांच्या घरीपण चोरी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र कोकणेंशी संपर्क होऊ शकला नाही . पाळत ठेवून ही भरदिवसा चोरी झाली असावी अशी चर्चा आहे.धुमाळ यांचा मुलगा आताच पुण्याहुन आला तसेच पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहे . भरदिवसा घरफोडी झाल्याने टाकळीभान परिसरात खळबळ उडाली असून सोन्याचे भाव सध्या लाखावर पोहचले आहेत. त्यात दिवसा हा घरातून सोने चोरीचा प्रकार घडला.