शिवप्रहार न्युज - थार गाडीमध्ये मुंबई येथे नेऊन मुलीवर बलात्कार...

थार गाडीमध्ये मुंबई येथे नेऊन मुलीवर बलात्कार...
संगमनेर- संगमनेर तालुक्यातील एका गावातील मुलगी कॉलेजला गेली होती.कॉलेज बाहेर आल्यावर तिला एका तरुणाचा फोन आला व त्या तरुणीला या आरोपी तरुणाने एका महिलेच्या घरी घुलेवाडी येथे बोलावले. तेथे दोन आरोपींनी या तरुणीला थार गाडीमध्ये बसवून मुंबई शहरातील मालाड येथे नेले.तेथे या तरुणीला दारू पाजून चॅापरचा धाक दाखवून आरोपींनी तिच्याशी शारीरिक संबंध केले.
दरम्यान हॉटेलमध्ये चार-पाच दिवस आरोपींनी या तरुणीला ठेवले होते अशी माहिती समजते आहे.त्यानंतर आरोपी हे या पिडित मुलीला संगमनेर येथे घेऊन आले.दरम्यान मुलीची मिसिंग दाखल झाल्यानंतर मुलीने पोलिसांसमोर घडलेली हकीकत सांगितली.यावरून मुलीची तक्रार घेण्यात आली व आरोपी रोहित दिघे,सौरभ शिंदे,सुरज शिंदे सर्व राहणार-संगमनेर व दोन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.