शिवप्रहार न्यूज-आयसर एन्ट्रन्स मध्ये भारतात प्रथम आलेला व IIT JEE उत्तीर्ण अवधूत जाधव याने ऑडीओ द्वारे दिला महत्वाचा कोरोना संदेश ...

शिवप्रहार न्यूज-आयसर एन्ट्रन्स मध्ये भारतात प्रथम आलेला व IIT JEE उत्तीर्ण अवधूत जाधव याने ऑडीओ द्वारे दिला महत्वाचा कोरोना संदेश ...

लोणी बुद्रुक – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान माजवले असून जिल्ह्या-जिल्ह्यात आपल्याला मृत्युचे तांडव चालू असल्याचे दिसत आहे.कोणाला बेड मिळेना,कोणाला ओक्सिजन मिळेना, कोणाला रेमडीसीवर मिळेना , कोणाला व्हेटीलेटर मिळेना,तर कोणाला ऑक्टेर्मा मिळेना अशी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रात आहे. काही ठिकाणी तर स्मशानात सुद्धा वेटिंग लाईन आहे.
         या सगळ्या संकटात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी काय करावे,काय टाळावे याबाबत भारत सरकारच्या आयसर,पुणे या रिसर्च संस्थेत शिकणारा लोणी बुद्रुक येथील रहिवासी अवधूत जाधव याने एक ऑडीओ संदेश दिला असून तो बातमी सोबत जोडलेला आहे.
अवधूत जाधव यांच्या ऑडीओ संदेश मधील ठळक मुद्दे – 
१.कोरोनाची मयक्रोस्कोप दुर्बीणद्वारे शास्रज्ञांनी प्रतिमा मिळवली आहे . त्यामुळे कोरोनाच्या अस्तित्वावर शंका घेवु नका .

२. whats App वरून कोरोना बाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहे. त्यामुळे whats App डॉक्टर वर विश्वास ठेवू नका योग्य वैदकीय उपचार घ्या .

३.कोरोनाची लक्षणे असतील तर अंगावर काढू नका लवकरात लवकर उपचार होवून स्वतः ला विलीगीकरन  करून घ्या .

४.कोरोनाची लक्षणे असताना बाहेर फिरू नका स्वतः च्या निष्काळजी पणामुळे इतरांचे जीव धोक्यात घालू नका .

५.कोरोना लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असे नसून कोरोना लसीमुळे कोरोना झाला तर रीकव्हरी लवकर होणार आहे.