शिवप्रहार न्युज - ३२ बत्तीस वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू…

शिवप्रहार न्युज - ३२ बत्तीस वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू…

३२ बत्तीस वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू...

 नेवासा - नेवासा तालुक्यातील इमामपूर येथील 32 वर्षीय शेतकरी गणेश काळे यांच्यावर काल सोमवार दि.१२ मे रोजी झालेल्या मुसळधार, वादळी,अवकाळी पावसामध्ये वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांचा एक सहकारी जखमी झाला आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की,गणेश शिवाजी काळे हे त्यांचे ५-६ सहकारी शेतकरी यांच्यासह डीपी दुरुस्तीचे काम करून परतत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली आणि त्यानंतर त्यांना नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल केले.परंतु तोपर्यंत ते मयत झाले होते. गणेश यांच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी ,भाऊ,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.