शिवप्रहार न्युज - वेदोत्सवमध्ये प्रथम आलेल्या दायमाचे बेलापुरात उद्या स्वागत...

शिवप्रहार न्युज -  वेदोत्सवमध्ये प्रथम आलेल्या दायमाचे बेलापुरात उद्या स्वागत...

वेदोत्सवमध्ये प्रथम आलेल्या दायमाचे बेलापुरात उद्या स्वागत...

   बेलापूर (शिवप्रहार न्युज)- महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील विद्यार्थी तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रीका पटकावली होती.

     श्रीराम जन्म भूमी ट्रस्ट चे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज तथा किशोरजी व्यास महाराज यांच्या हस्ते महेश दायमा यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्या यशानंतर महेश दायमा हे उद्या मंगळवार दि. १३ मे रोजी बेलापूर येथे आपल्या मुळ गावी येत असून त्यांच्या यशाबद्दल भव्य अशी मिरवणूक काढून सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

     उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूर ग्रमस्थ, गावकरी मंडळ, सकल राजस्थानी समाजाने केले आहे.