शिवप्रहार न्यूज- ०६ व्या दिवशी शिवप्रहारच्या नेतृत्वात गोरगरीब कामगार जिंकले…

०६ व्या दिवशी शिवप्रहारच्या नेतृत्वात गोरगरीब कामगार जिंकले…
श्रीरामपूर -श्रीरामपूर परिसरात असणाऱ्या सनफ्रेश/ लॅक्टेलीस(प्रभात डेअरी पूर्वीची)येथील कामगारांचे विविध मागण्यांसाठी भाऊबीजच्या दिवसापासून म्हणजेच 26 ऑक्टोबर पासून शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख,माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन तसेच नंतर आमरण उपोषण आंदोलन चालू होते.त्यामध्ये आजपर्यंत एकुण ०४ कामगारांना रुग्णालयात दाखले करावे लागले.परिस्थिती गंभीर होत असतांना त्यावर आज सोमवार दि.३१ ॲाक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल,दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्यामुळे तोडगा निघाला व कंपनीच्या प्रशासनाने ०५ तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर कामगारांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या.शेकडो कामगारांना या आंदोलनाला आलेल्या यशाचा फायदा होणार आहे.
कामगारांच्या मागण्या कंपनीकडून मान्य करून घेण्यात महाराष्ट्र राज्याचे महसूल,दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार आलेल्या शिष्टमंडळाने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच आंदोलनाला भेट देणारे खासदार सदाशिव लोखंडे व सर्व संचालक,माजी सभापती,सर्व सरपंच,उपसरपंच ,
सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते,पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे पाठींब्याबद्दल,मदतीबद्दल आंदोलकांनी आभार मानले.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांचे कामगारांनी विशेष आभार मानले.मान्यवरांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले.यावेळी शेकडो महिला व पुरुष कामगारांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी दीपक अण्णा पटारे,डीवायएसपी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक श्री.गवळी,शिवप्रहार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे,कामगार अधिकारी श्रीमती शेख,नाना शिंदे,संदीप चव्हाण,जितेंद्र छाजेड,गिरीधर आसने, चेअरमन सिद्धार्थ मुरकुटे,श्रीराम तालीम संघाचे अर्जुन दाभाडे, अशोक लोंढे,प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते,आप्पासाहेब धूस,रुपेश हरकल,सर्व ढोकचौळे पाटील, एकलव्य संघटना ,सरपंच शिरसाट, भीमशक्ती संघटना, काँग्रेसचे अभिजीत लिपटे तसेच कंपनीचे श्री.विनीत शहा,श्री.पाटील श्री.इंगे या अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कामगार व शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.