शिवप्रहार न्युज - सर्व मंत्री उद्या "मंत्रिमंडळ बैठक"साठी नगर जिल्ह्यात...

सर्व मंत्री उद्या "मंत्रिमंडळ बैठक"साठी नगर जिल्ह्यात...
चोंडी(जामखेड)-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त सरकारच्या वतीने राज्य मंत्री मंडळाची बैठक चौंडी येथे उद्या दिनांक 6 मे रोजी होणार आहे.इतिहासात पहिल्यांदा ग्रामीण भागात अशी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री,सर्व कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ग्रामीण भागातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीचा मान नगर जिल्ह्याला यानिमित्ताने मिळाला आहे.