शिवप्रहार न्यूज- शेतकऱ्याचे १ लाखाचे कांद्याचे बी चोरले…

शिवप्रहार न्यूज- शेतकऱ्याचे १ लाखाचे कांद्याचे बी चोरले…

शेतकऱ्याचे १ लाखाचे कांद्याचे बी चोरले…

श्रीरामपूर - तालुक्यातील गुजरवाडी येथील शेतकरी सागर शिवाजी जाधव यांच्या शेती गट नंबर ०६ मध्ये दहा गोण्यांमध्ये भरुन ठेवलेली एक लाख रुपये किमतीचे कांद्याचे बी अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

         याप्रकरणी सागर शिवाजी जाधव, वय 36 ,धंदा -शेती ,राहणार- गुजरवाडी ,तालुका श्रीरामपूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गायमुखे हे करीत आहेत.