शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात म्हाडा कॉलनीत चोरट्यांनी फ्लॅट फोडले…

श्रीरामपुरात म्हाडा कॉलनीत चोरट्यांनी फ्लॅट फोडले…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील बोरावकेनगरला लागून असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये तीन बंद फ्लॅट फोडून दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की,म्हाडा हौसिंग सोसायटीच्या बिल्डींगमध्ये राहणारे गिरीश जगधने,विक्रांत लोखंडे व श्री.मस्के यांच्या घरात दरवाजा तोडून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरली आहे.पोलिसांनी तात्काळ डॉग्स कॅाड व फिंगर प्रिंट तज्ञांना बोलावून पोलीस तपास चालू केला आहे.
या घटनेमुळे म्हाडा कॉलनीत खळबळ उडाली आहे.