शिवप्रहार न्यूज -तलवार हातात घेवुन टपरीच्या मागे आडोशाला दबा धरून बसलेल्या तडीपार आरोपीला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले

तलवार हातात घेवुन टपरीच्या मागे आडोशाला दबा धरून बसलेल्या तडीपार आरोपीला श्रीरामपूर पोलिसांनी पकडले...
वडाळा महादेव- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव या गावात श्रीरामपूर चे प्रांताधिकारी यांनी नेवासा,राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यातुन हद्दपार केलेला तडीपार आरोपी योगेश राजेंद्र काळे ,राहणार -वडाळा महादेव ,तालुका श्रीरामपूर हा वडाळा महादेव गावात विनापरवाना धारदार पाते असलेली तलवार बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून एसटी स्टँड जवळ एका टपरीच्या आडोशाला दबा धरुन बसलेला असतांना पोलिसांना मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तलवार जप्त केली. तसेच त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल श्री.पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात 284/ 2021 भारतीय हत्यार कायदा कलम 4 /25 व म पो का कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.दुधाडे हे करीत आहेत.