शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर पोलिसांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी दोन पोलीस निलंबित…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर पोलिसांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी दोन पोलीस निलंबित…

श्रीरामपूर पोलिसांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी दोन पोलीस निलंबित…

 श्रीरामपूर - तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर व पोलीस शिपाई योगेश शिवाजी राऊत या दोन कर्मचाऱ्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.संदीप मिटके यांनी पाठवलेल्या अहवालानुसार पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे.

         अवैध धंदे वाल्यांकडून हप्ते वसुली संदर्भातील ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती.त्यामुळे दोषींचे निलंबन करीत प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.