शिवप्रहार न्यूज- आज श्रीरामपुरात पालकमंत्री ना.मुश्रीफ यांच्या बैठकीत नगराध्यक्षांनी कोरोना सुविधांबाबत केल्या विविध मागण्या.

शिवप्रहार न्यूज- आज श्रीरामपुरात पालकमंत्री ना.मुश्रीफ यांच्या बैठकीत नगराध्यक्षांनी कोरोना सुविधांबाबत केल्या विविध मागण्या.

आज श्रीरामपुरात पालकमंत्री ना.मुश्रीफ यांच्या बैठकीत नगराध्यक्षांनी कोरोना सुविधांबाबत केल्या विविध मागण्या....

श्रीरामपूर-

       आज सकाळी श्रीरामपूरला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी कोरोना आढावा बैठक घेतली.शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकी मध्ये नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील रुग्णांना कोरोना काळातील सुविधा मिळाव्या यासाठी आग्रही मागणी केली. यामध्ये कोरोना पेशंट साठी आवश्यक असलेले ॲाक्सीजन,रेमडेसीवीर इंजेक्शन तातडीने मिळावे. तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेला एक कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी. श्रीरामपूर साठी रॅपीड टेस्टचे किट वाढवून मिळावेत. तसेच श्रीरामपुरातील आशा स्वयंसेविकांची पदे वाढवून द्यावीत अश्या मागण्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री यांच्याकडे आग्रहाने केल्या.