शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर पालिका निवडणुकीत जुन्यांना बसला धक्का ! आरक्षण सोडतीत नव्यांना मोठी संधी…

श्रीरामपूर पालिका निवडणुकीत जुन्यांना बसला धक्का ! आरक्षण सोडतीत नव्यांना मोठी संधी…
श्रीरामपूर - सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचविणाऱ्या श्रीरामपूर नगरपालिके च्या प्रभागाचे आरक्षण आज निश्चित झाले असून १७ प्रभागातून प्रत्येकी २ याप्रमाणे ३४ नगरसेवक निवडून द्यायचे असून यंदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्याने ३४ पैकी तब्बल २७ जागा या खुल्या झाल्या असून त्यात १४ सर्वसाधारण तर १३ महिला सर्वसाधारणसाठी खुल्या झाल्या आहेत. तर ७ जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित झाल्या आहेत.
नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभाग खुले झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे नगरसेवक होण्याची स्वप्न साकारले जाण्याची शक्यता आहे.
आज सकाळी नगरपालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभागातील आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या.
आरक्षण सोडतीचे पत्रक बातमी सोबत जोडलेले आहे.