शिवप्रहार न्यूज -कोव्हीड सेंटरला साईभक्ताकडून २५०० किलो केशर आंबे देणगी...

शिवप्रहार न्यूज -कोव्हीड सेंटरला साईभक्ताकडून २५०० किलो केशर आंबे देणगी...

कोव्हीड सेंटरला साईभक्ताकडून २५०० किलो केशर आंबे देणगी...

शिर्डी/ प्रतिनिधी : 

          शिरुर येथील एका शेतकरी साईभक्ताने सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले २५०० किलो केशर आंबे श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त‍व्यवस्था शिर्डीच्या श्री.साईप्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले. कोरोना काळातील साई संस्थानला अन्नदानातील हे सर्वात मोठे दान मिळाले आहे. साईबाबा संस्थानने शेतकऱ्याचे आभार मानले आहे.

       शिरूर तालुक्यातील एका शेतकर्याने आपल्या आंब्याच्या शेतीतील तब्बल २५०० किलो केशर आंबे साई संस्थानला देणगी म्हणून दिले. साईबाबा संस्थानच्या वतीने उभरण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसह, साईबाबा आणि साईनाथ रुग्णालयातील रुग्णांबरोबर परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमांनाही साई संस्थानाकडून दररोज मोफत जेवण दिले जाते. यामध्ये वरण-भात, दोन भाज्या आणि चपाती असते. तसेच आता केशर आंबे देणगी म्हणून मिळाले आहेत. आता या कोविड सेंटरमधील लोकांसह परिसरातील अनाथाश्रम व वृद्धाश्रमांनाही या आंब्याच्या रसाचे जेवण मिळणार आहे. 

         हे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले व उच्च प्रतीचे आहे.