शिवप्रहार न्यूज- भाजीपाला विक्रेत्याची पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; पोलीस निरीक्षकाची नेमप्लेट तुटली...

शिवप्रहार न्यूज- भाजीपाला विक्रेत्याची पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; पोलीस निरीक्षकाची नेमप्लेट तुटली...

भाजीपाला विक्रेत्याची पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की; पोलीस निरीक्षकाची नेमप्लेट तुटली...


पारनेर :  
          नगर जिल्ह्यातील पारनेर शहरात नागरिकांची गर्दी झाल्याने भाजी व फळवेक्रेत्यांना विक्री बंद करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.त्याचा राग आल्याने पारनेर पो.ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह दोन पोलीसांना भाजी विक्रेत्यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायायासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली .
          कोरोना प्रतिबंधक नियमाची अंमलबजावणी होते कि नाही हे पाण्यासाठी तहसीलदार ज्योती देवेरे व पोलीस निरीक्षक बळप आपल्या सहकाऱ्यासह शहरातील लाल चौकात गेले . तेथे भाजीविक्रेत्यांनी गर्दी केली होती . त्यामुळे त्यांना ध्वनिक्षेपकाद्वारे तेथून जाण्यास सांगण्यात आले . या अवाहनानंतर बहुतेक विक्रेते निघुन गेले. मात्र सुभाष कुलट,सचिन कुलट यांनी तहीसलदार देवेरे व पोलीस निरीक्षक बळप यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. भाजी विकुन झाल्याशिवाय येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच पोलीसांना शिवीगाळ करण्यसाठी सुरुवात केली . त्यानंतर पोलीस निरीक्षक बलप यांना धक्काबुक्की केली. त्यात बळप यांची  नेम प्लेट तुटली. पोलीस कर्मचारी सत्यजीत शिंदे व गहिनीनाथ यादव तेथे आले असता त्यांनाही धक्काबुकी झाली.
याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात हवालदार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून सुभाष कुलट,सचिन कुलट व बाबाजी खोडदे (सर्व रा.पारनेर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायासमोर हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.