शिवप्रहार न्युज - गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
नगर/शिर्डी- या प्रकरणी अधिक माहिती अशी की,श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रणजीत जाधव, सुनिल मालणकर, रमीजराजा आत्तार व विशाल तनपुरे अशांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
दिनांक 16/06/2025 रोजी पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाला व सुगंधीत तंबाखु विक्रेत्या इसमांची माहिती काढुन, पंचासमक्ष 02 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला 03 आरोपीविरूध्द खालीलप्रमाणे 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 27,017/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अ.क्र./पो.स्टे/गुरनं /जप्त मुद्देमाल/आरोपीचे नाव
1 शिर्डी पो.स्टे.गुरनं 655/2025 प्रमाणे 23,100/- आरोपी जाकीर अब्दुलशकुर अन्सारी, वय 60, रा.कालीकानगर, शिर्डी, ता.राहाता
2 शिर्डी पो.स्टे. गुरनं 656/2025 प्रमाणे 3,917/- 1. एक विधीसंघर्षित बालक, वय 17, रा.नवनाथनगर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर आरोपी2. दिनेश शिवाजी बहिरट, रा.बन शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार)
सदर कारवाई श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.