शिवप्रहार न्युज - हिंदुत्वाद्यांच्या सतर्कतेमुळे मेवात हॉटेलमधील गोमांस पदार्थ विक्रीचा पर्दाफाश ...

हिंदुत्वाद्यांच्या सतर्कतेमुळे मेवात हॉटेलमधील गोमांस पदार्थ विक्रीचा पर्दाफाश ...
राहुरी - राहुरी तालुक्यातील नगर- मनमाड रोडवरील गुहा परिसरातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात येथे चालू असलेले गोमांस पदार्थांच्या विक्रीचा प्रकार परिसराती हिंदुत्वादांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.तेथे गोवंश जातीचे मांस शिजवून त्याची भाजी बनवून विक्री केली जात होती.याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेळके,अहिरे,भोसले व पथकाने तात्काळ हॅाटेलवाला आरोपी मोहम्मद अली मोहम्मद सहनु,राहणार-जि.मेवात,राज्य -हरियाणा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या ठिकाणाहून 45 किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले.
या कार्यवाहीमध्ये शिवप्रहारच्या मावळ्यांसह बजरंग दल,विश्व हिंदू परिषद,आरएसएस व इतर हिंदुत्ववादी तरुणांनी सहभाग घेतला.पंचक्रोशीतील रामपूर, गुहा,कोल्हार,बेलापूर, उक्कलगाव, बाभळेश्वर,प्रवरानगर या गावांतील हिंदुत्ववादी तरुणांच्या सतर्कतेमुळे या प्रकाराचा पर्दाफाश झाला.