शिवप्रहार न्युज - सासूच्या घरी चोरी करणारा "चोरटा जावई" श्रीरामपूर पोलीसांनी धरला...

शिवप्रहार न्युज -  सासूच्या घरी चोरी करणारा "चोरटा जावई" श्रीरामपूर पोलीसांनी धरला...

सासूच्या घरी चोरी करणारा "चोरटा जावई" श्रीरामपूर पोलीसांनी धरला...

श्रीरामपूर- या प्रकरणी अधिक माहिती अशी की,दिनांक 09/06/2025 ते 12/06/2025 रोजीचे दरम्यान श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.02,जुने घरकुल, रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या रुकय्या जब्बार शेख या त्यांच्या राहते घराला व्यवस्थित कुलुप लावुन लोणी येथे नातेवाईकाकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडील असलेले सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी राहत्या घराच्या कपाटात ठेवले होते. तेव्हा रुकय्या जब्बार शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराची कडी सांध्यातुन विचकटवुन सुमारे 2,04,000/- (दोन लाख चार हजार रुपये) किंमतीचे सोन्याचे दागिने रोख रकमेसहीत चोरुन नेले होते. म्हणुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे रुकय्या शेख यांच्या तक्रारीवरुन गुरनं. 572/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांचे आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम व पोहेकॉ/ 1858 शफीक शेख, पोना/1769 भैरव अडागळे, पोकॉ/1787 धनंजय वाघमारे, पोकॉ/468 अकबर पठाण, पोकॉ/1071 रविंद्र शिंदे, चालक पोकॉ/बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने गुन्ह्याचा शास्त्रशुध्द तपास करुन सदर गुन्ह्यातील चोरी ही गुन्ह्यातील फिर्यादी रुकय्या शेख यांचा जावई साद शौकत शेख याने केलेली असल्याचे निष्पन्न केले. त्यावरुन आरोपी चोरटा जावई साद शौकत शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सासू रुकय्या शेख हिने उसने पैसे दिले नाही म्हणुन त्याचा राग येऊन गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेला माल 1,94,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हजर केले असुन सदरचे सोन्याचे दागिने फिर्यादी रुकय्या जब्बार शेख यांनी ओळखुन ते त्यांचेच असल्याचे त्यांनी खात्री केली आहे.

        सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे ,मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे वरील पथकाने केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करत आहे