शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूरात रात्री 1 वाजता विनयभंग करून खुनाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

श्रीरामपूरात रात्री 1 वाजता विनयभंग करून खुनाचा प्रयत्न; गुन्हा दाखल
श्रीरामपूर- श्रीरामपुरात काल रात्री उशिरा वार्ड नंबर 2 मध्ये घरात घुसून महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला तलवार कत्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये 6 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यातील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वार्ड नंबर 2 मधील बीफ मार्केट पलीकडे असलेल्या रेल्वे लाईन जवळून पीडित महिलेचा पती घरी जात असताना येथील आरोपी सुलतान याने काही कारण नसताना त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित महिलेचा पती घरी गेला असता आरोपींनी तलवार, लोखंडी कत्ती घेऊन सुलतान शिरू पठाण, मुल्ला कट्टर उर्फ इमरान युसुफ कुरेशी, आशु लियाकत पठाण व इतर तीन अनोळखी इसम यांनी रात्री एक वाजता पीडित महिलेच्या घराचा दरवाजा वाजवला. पीडित महिलेने दरवाजा उघडला असता पीडित महिलेच्या पतीला उद्देशून 'काहा चुपके बैठा है' उसको जादा चरबी चढी क्या, बोल तेरे को किसको बुलाना है. असे म्हणत पीडित महिलेला धक्काबुक्की करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सर्व आरोपींनी केले. तसेच पीडित महिलेच्या पतिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सुलतान याने तलवारीने वार केला त्याने तो वार चुकविला.
याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिल्यावरून आरोपी सुलतान शेरू पठाण, मुल्ला कटर उर्फ इम्रान युसूफ कुरेशी, आशु लियाकत पठाण सर्व रा. वार्ड.नं. 2 यांच्यासह तीन अनोळखी आरोपींविरूद्ध भादवि कलम 143, 147, 148, 149, 307, 452, 354, 354-B, 323, 504, 506, 34 प्रमाणे गु.र.नं.347 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुलतान शेरू पठाण, मुल्ला कटर उर्फ इम्रान युसूफ कुरेशी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.बोरसे हे करीत आहे.
मुल्ला कटर व सुलतान या आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींनी न्यायाधीशा समक्ष स्वतःचे कपडे काढून घेत पोलिसांनी मारहाण केल्याचा कांगावा केल्याचे समजते.