शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील पोलीस मदत केंद्र हटवा जलसंपदा विभागाची नोटीस...

श्रीरामपुरातील पोलीस मदत केंद्र हटवा जलसंपदा विभागाची नोटीस...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील महत्त्वाच्या असलेल्या भगतसिंग चौकामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र ०७ दिवसाच्या आत हटवण्यात यावे अशी नोटीस श्रीरामपूर जलसंपदा विभागाच्या बेलापूर रोड,सिंचन शाखा कार्यालयाने काढली आहे. तात्काळ जागा रिक्त करावी असे नोटिसीत म्हटले आहे.अन्यथा सिंचन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही नमूद केले आहे.
दुसरी बाजू अशी की, या पोलीस चौकीमुळे या परिसरातील व शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.या मुद्द्याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही असे जाणकार नागरिकांचे मत आहे.