शिवप्रहार न्युज - प्रभाग रचना सादर करण्याची आयोगाची सूचना;लवकरच पालिका निवडणुका...

शिवप्रहार न्युज -  प्रभाग रचना सादर करण्याची आयोगाची सूचना;लवकरच पालिका निवडणुका...

प्रभाग रचना सादर करण्याची आयोगाची सूचना;लवकरच पालिका निवडणुका...

 मुंबई/श्रीरामपूर- राज्यातील नगरपालिका,नगरपरिषद,महानगरपालिकांच्या निवडणुका ०४ महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागच्या महिन्यात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान दिले होते.

          त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला लवकरात-लवकर प्रभाग रचना संदर्भातील कामे आटोपण्याची सूचना केली आहे.याबाबत अशी माहिती समजते की,या आठवड्यातच राज्य सरकार प्रभाग रचनेचे कामं आटोपून घेणार आहे .ते झाल्यावर आरक्षण आणि मतदार यादी अंतिम करणे ही कामे केली जाणार असून नंतर अधिसूचना काढली जावून निवडणुकीची घोषणा होईल.त्यामुळे दिवाळीच्या आतच निवडणुका होण्याची अतिशय दाट शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे श्रीरामपुरातील गुडघ्यावर बाशींग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांमध्ये खुषीचे वातावरण निर्माण झाले आहे.