शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहर पोलीसांमुळे २५ गोवंशांना जीवनदान...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर शहर पोलीसांमुळे २५ गोवंशांना जीवनदान...

श्रीरामपूर शहर पोलीसांमुळे २५ गोवंशांना जीवनदान...

श्रीरामपूर शहर :- दिनांक 04/06/2025 रोजीचे सविस्तर वृत्त असे की जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, नेवासा फाटा-श्रीरामपूर रोडवरील बोर्ड क्र.2 येथे एका गोवंशांची वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना केली होते

त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अंमलदार अशोक पाटोळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, नेवासा फाटा-श्रीरामपूर रोडवरील बोर्ड क्र. 2 येथे एका गोवंशांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करण्यात आली.

         सदर टेम्पो क्रमांक एम. एच. 20 सी. बी. 1696 या वाहनात चालकाने अवैधरित्या 25 गोवंश जनावरे (बैल व गाय) वाहतूक करत असल्याचे माहिती दिली पोलिस तपासात असे आढळले की ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची शक्यता असून, ही वाहतूक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता होत होती.या प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:

25 गोवंश जनावरे (सुमारे ₹5,25,000/- किंमतीची)

व टेम्पो वाहन (सुमारे ₹2,00,000/- किंमतीचे)

         सदर प्रकरणात चालकाविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 5(अ), 5(ब), 5(ग), 9, तसेच भा.दं.वि. कलम 11(1)(अ), 11(1)(न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

         ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कुलबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व अंमलदार यांनी केली.