शिवप्रहार न्युज - संगमनेरातून शिर्डीत आणून हॉटेलात दोघींवर बलात्कार!

संगमनेरातून शिर्डीत आणून हॉटेलात दोघींवर बलात्कार!
शिर्डी ( शिवप्रहार न्युज) संगमनेर परिसरातून दोन तरुणींना शिर्डीत आणून हॉटेलच्या रुममध्ये बलात्कार करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिर्डीत हॉटेल लॉज मध्ये तरुणींवर बलात्कार करण्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले असुन त्याने शिर्डी व संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सादतपूर,संगमनेर येथील २१ वर्षाच्या पिडीत विद्यार्थीनीने पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी शुभम विजय डेंगळे रा.सादतपूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (१),३५१ (२),३५१ (३),३५६ (२ )प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.विद्यार्थिनीने तक्रारीत म्हटले आहे की,आरोपी शुभम डेंगळे याने त्याच्या सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून शिर्डीला नेवून तेथे हॉटेल साईच्या रूममध्ये बळजबरीने बलात्कार केला. तसेच मित्र गायधने,कारले,बोरसे व इतर नातेवाईकांना फोटो पाठवीन तसेच पुन्हा आली नाही, तर तुझ्या आई वडीलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून दोघांबद्दलच्या स्टोरीज इस्टाग्रामवर टाकल्या होत्या.
दुसऱ्या घटनेत पिडीत २३ वर्षाच्या तरुणीने शिर्डी पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आरोपी आदनान बागवान, रा. कोपरगांव याने संगमनेर येथून जय हिंद करियर ऑकडमी येथून बळजबरीने काळ्या अक्टिव्हा गाडीवर बसवून शिर्डी येथे आणुन हॉटेल रामा विठ्ठला येथे रात्र झाली येथेच थांबू असे म्हणत हॉटेलच्या खोलीत बळजबरीने बलात्कार केला.
पिडीत तरुणीचे आईवडील,मामा तिला शोधत शिर्डी येथे आले असता आरोपी आदनान बागवान याने त्यांना शिवीगाळ करत,दगडाने मारून पळून गेला. या प्रकरणी पिडीतेच्या वरील तक्रारीवरून आरोपी आदनान बागवान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (१),८७,११८, (१)३५२ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोनि गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कचरे व पोसई जाधव हे आरोपीचा शोध घेत आहेत .