शिवप्रहार न्यूज-आज सकाळी बेलापूररोडला भीषण अपघातात टँकरखाली चिरडून बाप-लेकीचा मृत्यू …

शिवप्रहार न्यूज-आज सकाळी बेलापूररोडला भीषण अपघातात टँकरखाली चिरडून बाप-लेकीचा मृत्यू …

आज सकाळी बेलापूररोडला भीषण अपघातात टँकरखाली चिरडून बाप-लेकीचा मृत्यू …

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेलापूर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार/वेशीपासून जवळच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरासमोर आज शनिवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास एका टॅंकर खाली चिरडून मोटरसायकल वरील बाळासाहेब गायकवाड व त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.

        या घटनेची अधिक माहिती अशी की,श्रीरामपूरकडून- बेलापूरकडे चाललेला मळीचा लोडेड टँकर क्रमांक एमएच 43 यु 3335 या टँकर खाली बेलापूरकडून -श्रीरामपूरकडे येणारी मोटर सायकल बजाज सिटी हंड्रेड क्रमांक एम एच 17 सीएन 7131 ही गाडी आली.त्यामुळे मोटर सायकलवर मागे बसलेल्या तरुणीचा टँकरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.टँकरने जवळपास शंभर फुटापर्यंत या तरुणीला फरफडत नेले.या घटनेनंतर टँकर चालक जागेवरून पसार झाला आहे.

        घटनेची माहिती समजतात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री.लाला पटेल व श्री.राहुल नरवडे यांच्यासह इतरांनी स्थानिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात पोहोचवला.

          अपघातात मयतांची नावे - मुलीचे नाव दिपाली बाळासाहेब गायकवाड, वय २० वर्ष व तिचे वडील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड, वय-५० वर्ष अशी आहेत.यातील जखमी बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अजित बाळासाहेब गायकवाड याला पुढील उपचारकामी नगर येथे हलवण्यात आले आहे.

         शहर पोलिसांकडून पुढील कारवाई चालू आहे.