शिवप्रहार न्युज - मंत्रिमंडळ बैठक यशस्वी पार पडल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक...

मंत्रिमंडळ बैठक यशस्वी पार पडल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक...
नगर - नगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील पहिली मंत्रिमंडळ बैठक ०६ मे २०२५ रोजी पार पडली.या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री गण उपस्थित होते.
.यावेळी प्रशासनाने चोख व्यवस्था या मंत्रिमंडळ बैठकी करता ठेवल्याने अनेक मंत्र्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे कौतुक केले. जागरूक नागरिकांनी देखील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे याबाबत कौतुक केले आहे.