शिवप्रहार न्यूज- हरेगावमध्ये पंडित आणि बोधक कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी;परस्परविरोधी गुन्हे दाखल...

शिवप्रहार न्यूज- हरेगावमध्ये पंडित आणि बोधक कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी;परस्परविरोधी गुन्हे दाखल...

हरेगावमध्ये पंडित आणि बोधक कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी;परस्परविरोधी गुन्हे दाखल...

श्रीरामपूर -याबाबतची हकीकत अशी की,तालुक्यातील हरेगाव मध्ये पंडित आणि बोधक कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये पहिल्या तक्रार फिर्यादी किरण राजू बोधक ,वय 34 वर्ष ,धंदा-रिक्षाचालक ,राहणार -डी कॉर्टर,हरेगाव यांनी फिर्याद दिली की,आरोपी काईन विठ्ठल पंडित, राहणार- डी.कॉर्टर हरेगाव याने फिर्यादीचा भाऊ राहुल याला डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळील पाण्याच्या टाकीवर पाणी भरत असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली.म्हणुन त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी हे आरोपीकडे गेले आणि आरोपीला समजून सांगू लागले. त्याचा राग आरोपी पंडित याला आला आणि त्याने तेथे पडलेली वीट उचलुन फिर्यादी किरण याच्या कानाला व हाताला मारली व आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातावर चावा घेतला म्हणून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 122/2021 भादवि कलम 325 तीनशे 23 337 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  दुसर्या गुन्ह्यात फिर्यादी काईन विठ्ठल पंडित ,वय 47 वर्षे ,धंदा -शेती,राहणार -उंबरगाव आऊटसाईड यांनी फिर्याद दिली की,मागील भांडणाच्या कारणावरून आरोपी किरण राजू बोधक, राजू एकनाथ बोधक, प्रभाकर साळवे व इतर तीन व्यक्तींनी मिळून फिर्यादी पंडित यांना लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी पंडित यांची मुलगी सुहानी हिला देखील मारहाण करून शिवीगाळ केली. त्यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 123/ 2021 भादवि कलम 143,147,149,324,323,504 ,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक श्रीमती गायकवाड या करीत आहे.