शिवप्रहार न्यूज- नगर जिल्ह्यातील अग्नीवीर भरतीचा कर्नल किरकी यांच्याकडून आढावा…

नगर जिल्ह्यातील अग्नीवीर भरतीचा कर्नल किरकी यांच्याकडून आढावा…
नगर -नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या अग्नीवीर लष्करी भरती प्रक्रियेचा नुकताच कर्नल श्री.किरकी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथे आढावा घेतला.केंद्र सरकारने यावर्षीपासून अग्नीवीर लष्करी भरती योजना चालू केलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस भारतीय लष्कराचे कर्नल श्री.किरकी यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,आमदार मोनिका राजळे यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी मंडळी उपस्थित होती.