शिवप्रहार न्युज - अवकाळीमुळे शहर-तालुक्यात अनेकांचे नुकसान...

शिवप्रहार न्युज -  अवकाळीमुळे शहर-तालुक्यात अनेकांचे नुकसान...

अवकाळीमुळे शहर-तालुक्यात अनेकांचे नुकसान...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर व तालुक्यासह अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.उकाडा कमी झाला असून रात्री देखील तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले दिसून येत आहे.काही ठिकाणी काल व परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा व फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

       तसेच काही ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला.सुसाट्याचा वारा सुटत असल्याने शहरातही काही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले,काहींचे शेड उडाले.या अवकाळी पावसामुळे व त्यासोबतच्या सुसाट वाऱ्यामुळे नागरिकांचे मात्र नुकसान होत आहे.