शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात सासुच्या घरी झाली घरफोडी; जावयाने दिली पोलीसांत फिर्याद

श्रीरामपुरात सासुच्या घरी झाली घरफोडी; जावयाने दिली पोलीसांत फिर्याद ...
श्रीरामपूर -लॅाकडाऊन मुळे बेरोजगार झालेले काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व सराईत चोरट्या गुन्हेगारांमुळे नगर जिल्ह्यातील चोरी आणि लुटमारीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे. असाच एक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला असून याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी सुशील सखाराम कदम,राहणार -सूतगिरणी ,दत्तनगर, श्रीरामपूर शहर यांची सासू राहत असलेल्या पठाण वस्ती ,वॉर्ड नंबर 1 ,श्रीरामपूर शहर येथील बंद घरात कुलूप कोयंडा तोडून ,दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने प्रवेश केला आणि आणि फिर्यादीच्या सासूच्या घरातील आठ पितळी हंडे ,एक पितळी पातेले ,एक पितळी बंब ,एक टीव्ही, सेटटॅाप बॉक्स, एक कॉम्प्युटर ,एक सीपीयू,एक होम थेटर आणि काही रक्कम असा एकूण जवळपास तीस हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला म्हणून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 249/ 2021 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.पवार हे करीत आहेत.