शिवप्रहार न्यूज- नटराजची बोळ परिसरात तरुणीची पर्स चोरीला...

शिवप्रहार न्यूज- नटराजची बोळ परिसरात तरुणीची पर्स चोरीला...

नटराजची बोळ परिसरात तरुणीची पर्स चोरीला...

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील प्रमुख मार्केट असलेल्या नटराज बोळ परिसरातील अमोल फुटवेअर दुकान ते नटराज बुक स्टॉल च्या दरम्यान सुषमा सुशांत सातदिवे, वय 34 वर्ष ,राहणार- वडणे वस्ती ,वॉर्ड नंबर सात ,श्रीरामपूर यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. या पर्समध्ये साडे तेवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व इतर महत्त्वाचे कागदपत्र होत.

       याप्रकरणी सात दिवे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री.काळे हे करीत आहेत.