शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरकरांची झाली गैरसोय. “डोस होते दोनशे लोक आले पाचशे”

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरकरांची झाली गैरसोय.  “डोस होते दोनशे  लोक आले पाचशे”

कोरोना लसीच्या कमतरतेमुळे 

श्रीरामपुरकरांची झाली गैरसोय.

“ढोस होते दोनशे

लोक आले पाचशे”

 श्रीरामपुर-

          एकीकडे शासनाकडून लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे,मात्र दुसरीकडे लसीकरण केंद्रावर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने श्रीरामपुरकरांची मोठी गैरसोय झाल्याचे श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय येथे पहायला मिळत आहे.

      दोन दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या लसीकरण केंद्रावर लशीची मात्रा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे . मात्र काल उपलब्ध २०० मात्रा होत्या तर ५०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती होती . या वेळी गैरसोयीमुळे गोंधळ झाल्याने नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यावर आली होती. लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने येथील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण वाढला आहे.नागरिक पहाटे सहा वाजेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करतात परंतु पुरेशा लशी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

          शासनाने लसीकरण केंद्रावर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करावा व गैरसोय टाळावी असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.तसेच ग्रामीण रुण्गालय प्रमुखांनी श्रीरामपूर साठी पुरेशा लशी सरकारकडून कशा मिळतील यासाठी पाठपुरवठा करणे गरजेचे आहे.