शिवप्रहार न्यूज- छत्रपती शिवाजी महाराज रोडवर गरीब व्यवसायिकाची गाडी फोडली...

शिवप्रहार न्यूज- छत्रपती शिवाजी महाराज रोडवर गरीब व्यवसायिकाची गाडी फोडली...

छत्रपती शिवाजी महाराज रोडवर गरीब व्यवसायिकाची गाडी फोडली...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील किशोर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराज रोडलगत असणाऱ्या एडीसी बँकेजवळ जेष्ठ नागरिक श्री.हरिभाऊ बोर्डे,वय 75 हे भेळीची गाडी लावुन व्यवसाय करतात.

       काल रात्रीतून कोणीतरी अज्ञात आरोपीने ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ बोर्डे यांच्या गाडीचे काचा फोडून मोठे नुकसान केले आहे.या ठिकाणी बँकेचा वाचमन रात्री सुरक्षेकरिता असतो.तरीदेखील असा प्रकार घडला आहे.

        येथे रात्री दारू पिण्यासाठी बसणाऱ्या दारुड्यांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज काही सुजाण नागरिक व्यक्त करत आहे.त्याच दारुड्यांनी या गरीब ज्येष्ठ नागरिकाच्या गाडीचे मोठे नुकसान केले असावे.