शिवप्रहार न्यूज- ग्रामपंचायत सदस्यपतीस शिवीगाळ करणार्या ग्रामसेवक संदीप बडाखचा चौकशी अहवाल झेड.पी.कडे पाठविणार- BDO

.
श्रीरामपूर – महिला ग्रामपंचायत सदस्याला व तिच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कडीत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक संदीप बदाख यांची विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी अहवाल येताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर पंचायत समितीचे प्र.गटविकास अधिकारी (BDO)संजय दिघे यांनी दिली.
श्रीमती वैशाली मेगनर या कडीत ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांचे पती ज्ञानेश्वर आबासाहेब मेगनर यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी ग्रामसेवक संदीप बदाख यांच्याकडे कडीत ग्रामपंचायती संदभात माहितीच्या अधिकारात काही कागदपत्रे मागितली होती . कागदपत्रे मिळावी म्हणून अनेकवेळा सक्षम भेटून विनंती देखील केली पण माहिती मिळाली नाही. म्हणुन २६ एप्रिल २०२१ रोजी ग्रामसेवक बडाख यांना फोन करून कागदपत्रांची विचारणा केली असता बडाख यांनी अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पत्नी वैशाली हिने समजावुन सागण्याचा प्रयत्न केला असता मी तुला माहिती अधिकारात माहिती देणार नाही . तुला काय करायचे ते कर व तू कुठे नोकरी करतो ते मी पाहतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याने मेनगर यांनी लोणी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गटविकास अधिकारी दिघे यांनी सांगितले की , याबाबत विस्तार अधिकारी विजय तरोट यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे . दोन दिवसात अहवाल मिळेल . त्यानंतर पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे .