शिवप्रहार न्यूज- नेवाशाच्या तरुणाची श्रीरामपुरात रेल्वे खाली आत्महत्या; लॅाकडाऊन मुळे आत्महत्या केल्याची चर्चा

नेवाशाच्या तरुणाची श्रीरामपुरात रेल्वे खाली आत्महत्या; लॅाकडाऊन मुळे आत्महत्या केल्याची चर्चा ...
श्रीरामपूर- श्रीरामपुर स्टेशन ते पढेगाव स्टेशन या लाईन दरम्यानच्या भागात मातापूर शिवारात लॅाकडाऊन मुळे काम गेल्याने भारत मोहन बर्डे,वय-४०,रा-साईनाथनगर,नेवासा याने रेल्वे क्रमांक २१८०४ या रेल्वे गाडीखाली येवुन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. जोरदार धडक बसल्याने त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी उपस्टेशन प्रबंधक श्रीरामपूर(बेलापूर) रेल्वे स्थानक यांनी माहीती दिल्यावरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक ४०/२०२१ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.मयत भरत बर्डे याच्या खिशात सापडलेला रोजगार हमी योजनेच्या कार्ड वरुन त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी घटनास्थळी पो.नि.सानप यांनी भेट दिली. पुढील चौकशी पो.ना.दुथाडे हे करत आहेत. दहा दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड भागात एका तरुणाने लॅाकडाऊन मुळे काम गेल्याने गळफास घेवुन आत्महत्या केली होती.
भरत बर्डे याने देखील रोजगार हमीचे काम गेल्याने आत्महत्या केली असे बोलले जात आहे.