शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरातील सरकारी कोवीड सेंटरमधील जेवण-नाश्ता देणारा ठेकेदार बदलला;शहरात उलट-सुलट चर्चा.

श्रीरामपुरातील सरकारी कोवीड सेंटरमधील जेवण-नाश्ता देणारा ठेकेदार बदलला;शहरात उलट-सुलट चर्चा.
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील शासकीय कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना जेवण आणि नाष्टा पुरवणारा ठेकेदार याच्या कार्यपद्धती बाबत अनेक तक्रारी आल्याने तसेच या कोवीड सेंटरला पुरवण्यात येणारा नास्ता व जेवण हे उत्तम दर्जाचे मिळणे आवश्यक असल्याने विद्यमान आमदार यांनी हा ठेकेदार बदलून त्याऐवजी “साई केटरर्स” नावाचा नवीन ठेकेदार या शासकीय कोवीड सेंटरला नाश्ता व जेवण याचा पुरवठा करण्यासाठी निवडावा अशी सूचना तहसीलदार श्रीरामपूर यांना केली होती.
त्यानुसार तहसीलदार,श्रीरामपूर यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांना आदेश काढून आमदार यांच्या शिफारशी नुसार श्रीरामपूर शहरातील “साई केटरर्स” या ठेकेदाराला शासकीय कोवीड सेंटरला नाश्ता व जेवण पुरवण्याचा ठेका देण्याची आदेश दिलेले आहेत.
तरी येथील जुना ठेकेदार हा चांगले जेवण देत असल्याबाबत एका आघाडीच्या दैनिकाने मोठी बातमी छापली होती.त्यात कोरोना रुग्णांना चांगले जेवण मिळत असल्याच्या प्रतिक्रिया देखील छापल्या होत्या.त्यामुळे पेशंट घरुन जेवण मागवत नव्हते असे देखील त्या बातमीत नमुद होते. असे सर्व सुरळीत असतांना हा चांगले जेवण देणारा ठेकेदार बदलुन नवीन ठेकेदार का आणला ? असा सवाल श्रीरामपुरातील काही जागरुक नागरिकांकडून विचारला जात आहे.