शिवप्रहार न्यूज- राहुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी नशेबाज औषधांचा साठा जप्त; खुनातील आरोपी पकडले; दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले. डीवायएसपी संदीप मिटके पोनि.दराडे यांची कामगिरी...

राहुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी नशेबाज औषधांचा साठा जप्त; खुनातील आरोपी पकडले; दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले. डीवायएसपी संदीप मिटके पोनि.दराडे यांची कामगिरी...
राहुरी (प्रतिनिधी)- काल दुपारपासून ते रात्रभर राहुरी शहर व परिसरात एसपी मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोनि.प्रताप दराडे यांनी धडाकेबाज कामगिरी केली.
राहुरी शहरात 'उपसरपंच चहा' हे दुकान चालविणाऱ्या शेखकडे अवैध नशेबाज औषधांचा साठा सापडला. या औषधांची किंमत साधारण 38 लाख रुपये आहे. या प्रकरणी राहुरी शहर पोलीसात आरोपी जमील मेहबूब शेख वय-32 राहणार-जुना कनगर रोड, राहुरी, अख्तर चांद शेख वय-21 राहणार- मल्हारवाडी रोड, राहुरी या दोघांविरुद्ध अन्न व औषध विभागाचे ज्ञानेश्वर मोहन दरंदले यांनी फिर्याद दिल्यावरून भादवि कलम 328 420 276 34 सह गुंगी औषधे द्रव्य आणि मानव जीवितस विपरीत पदार्थ व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसऱ्या घटनेत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील रस्त्यावर अफगाणिस्तानातला धर्मगुरू अफगाणी धर्मगुरू याची हत्या झाली होती. त्या प्रकरणातील फरार आरोपी तिघांना पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एका हॉटेल ला छापा टाकून पकडले. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्याच दरम्यान पुन्हा राहुरी पोलिसांना राहुरीतील राहुरीतील वर शिंदे घाटात काही तरुण आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी सुरेश जाधव वय- 22 राहणार- म्हैसगाव, बुधा बिका पारधी वय- 22 राहणार - म्हैसगाव रमेश देवराम जाधव वय- 20 राहणार - म्हैसगाव, कैलास संपत आगलावे राहणार- गर्दनी तालुका अकोले, संदीप शिवाजी जाधव वय- 22 राहणार- दरडगाव राहुरी यांच्या विरुद्ध राहुरी पोलिसात भादवि कलम 399 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींजवळून धारधार दोन चाकू, दोन दुचाकी जप्त करण्यात आले. राहुरी पोलिसांच्या व डीवायएसपी संदीप मिटके यांच्या अठरा तासातील या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. पकडलेल्या आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुंगीच्या औषध प्रकरणातील शेख आरोपी नेमके कुठले आहेत याचा पोलीस कसून शोध घेत आहे.