शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात भाजल्याने एकाचा मृत्यू तर टाकळीभान मध्ये तरुण बुडाला…

श्रीरामपूर शहरात भाजल्याने एकाचा मृत्यू तर टाकळीभान मध्ये तरुण बुडाला…
श्रीरामपूर -शहरातील वार्ड नंबर 1, नेवासा रोड, भिमनगर येथे राहणारे संजू हरिभाऊ गोफणे ,वय 45 वर्ष हे स्टोव्हचा भडका होवून भाजले.भडका झाल्याने तेथे असलेली डिझेलची बाटली पेटली त्यामुळे आग आणखी भडकली आणि संजू गोफणे मोठ्या प्रमाणावर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून कोणी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नेमका प्रकार कसा घडला याचा पुढील तपास करीत आहे.
दुसर्या घटनेत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पाण्याच्या टेल टॅंक मध्ये पोहण्यासाठी तीन तरुण गेले होते. त्यातील प्रशिक्षण घेण्यासाठी पाण्यात उतरलेला स्वराज सुरेश कोकणे ,वय 18 वर्षे हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. तीन तासापासून स्वराजला पाण्यात शोधण्याचे काम सुरू असून घटनास्थळी मदत कार्य चे पथक, पोलिस व तहसीलदार प्रशांत पाटील थांबून आहेत. श्रीरामपूर शहरात व तालुक्यात अशा प्रकारे दोन दुःखद घटना घडल्या.