शिवप्रहार न्यूज- शिवछत्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदम विरोधात पुन्हा गुन्हा दाखल...

शिवछत्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदम विरोधात पुन्हा गुन्हा दाखल...
नगर - नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात ज्युस विक्रीचा व्यवसाय करणारे भगीरथ बोडके या गरीब टपरी धारकाला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम त्याचा भाऊ व इतर चाळीस जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तसेच आरोपींनी टपरी धारकाच्या शटरचे नुकसान करून लूटमार देखील केली असून टपरीधारक बोडके यांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस स्थान पोलीस ठाण्यात छिंदम व त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.