शिवप्रहार न्यूज- कर्नाटकात अफजलपुरजवळ झालेल्या अपघातात नगर जिल्ह्यातील एकाच परिवारातील 5 भाविक ठार…

कर्नाटकात अफजलपुरजवळ झालेल्या अपघातात नगर जिल्ह्यातील एकाच परिवारातील 5 भाविक ठार…
नगर- कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये असलेल्या गाणगापूर येथे श्रीदत्त भगवानचे देवदर्शन करून नगरकडे परतत असताना अफजलपुर- बहुरगी रोडवर मोटरकार क्रमांक एम एच 16 बीएस 5392 या चार चाकी वाहनाचा झाडावर आदळून अपघात झाला.यामध्ये गाडीच्या चालकासह पाच जण जागीच ठार झाले.
गाडीतील सर्व प्रवासी नगर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मयतांमध्ये बाबासाहेब वीर,कोमल वीर,राणी वीर हिराबाई ,छाया वीर यांचा समावेश असून सायली वीर,चैताली सूर्यवंशी या दोन लहान मुली जखमी झाल्या आहेत.
याबाबत पुढील तपास गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपुर पोलिसांकडून चालू आहे.