शिवप्रहार न्यूज- पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न; फुटलेल्या दारूच्या बाटलीने गळ्यावर वार...

शिवप्रहार न्यूज- पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न; फुटलेल्या दारूच्या बाटलीने गळ्यावर वार...

पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न; फुटलेल्या दारूच्या बाटलीने गळ्यावर वार...

कोपरगाव- अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांबरोबर वाद घालून सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला दारूच्या फुटलेल्या बाटलीने गळ्यावर वार करून खुनाचा प्रयत्न करण्याची घटना कोपरगावमध्ये घडली आहे.

       याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव मधील भिल्ल वस्ती, जवळके येथे गुलाब माळी चालवीत असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता येथील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून वाद घालत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करून जखमी केले. यावेळी आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलीस नाईक किशोर हस्ती कराव अवताडे हेही जखमी झाले आहेत. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या खाजगी वाहन तसेच मोबाईल फोडून दहशत माजविली.

        याप्रकरणी पोलीस नाईक किशोर अस्तिकराव औताडे ( नेमणूक-शिर्डी पोलिस स्टेशन ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलाब रतन माळी, वसंत मोरे, नवनाथ माळी, राजू सोन्याबापु मोरे, अलका राजू मोरे, मंगल रतन माळी, अनिता ज्ञानेश्वर माळी, नितीन राजू मोरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी नातेवाईक (सर्व रा. भिल्ल वस्ती, जवळके, ता.कोपरगाव यांच्याविरुद्ध गुरंन.२०५/२०२२, भादवि कलम 307, 353, 143, 147, 148, 149, 332, 333, 427, 504, 506 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनास्थळी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सातव, पोनि.श्री.पाटील, सपोनि श्री.दातरे, पोसई.श्री.माळी यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास पोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पाटील हे करीत आहेत.