शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील ओमिक्रोन बाधित महिलेला डिस्चार्ज…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील ओमिक्रोन बाधित महिलेला डिस्चार्ज…

श्रीरामपुरातील ओमिक्रोन बाधित महिलेला डिस्चार्ज…

श्रीरामपूर - नोकरीनिमित्त नायजेरियाचा दौरा करून श्रीरामपुरात आलेल्या एका महिलेला ओमॅक्रोनची लागण झाली होती.ओमॅक्रोन पॉझिटिव आल्यानंतर या महिलेवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.उपचारादरम्यान महिलेची पुन्हा तपासणी केली असता सदर महिलेचा व तिच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

       या ओमिक्रोन बाधित महिलेने कोरोनाचे दोन डोस घेतलेले असल्यामुळे त्या उपचार घेऊन लवकर बर्‍या झाल्या आहेत.म्हणून कोरोना व ओमॅक्रोन चा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजश्री देशमुख यांनी सांगितले.