शिवप्रहार न्यूज- खासदारांकडे ॲम्ब्युलन्सची मागणी करणे म्हणजे सरकारी कामात अडखळा आणल्याचा गुन्हा होतो का ? - ग्रामस्थांचा संतप्त सवाल...

खासदारांकडे ॲम्ब्युलन्सची मागणी करणे म्हणजे सरकारी कामात अडखळा आणल्याचा गुन्हा होतो का ? - ग्रामस्थांचा संतप्त सवाल...
श्रीरामपूर- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे उपलब्ध ॲम्ब्युलन्स अपुर्या पडत आहेत. वेळेवर ॲब्युलन्स मिळत नाही म्हणुन गोर-गरीब नागरिक मरत आहेत. तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी लवकरात लवकर पुढाकार घेवुन त्यांच्या पढेगाव-उंबरगाव परिसरात असणाऱ्या साई खेमांनद मेडीकल संस्थेमध्ये असलेल्या दोन नवीन मोठ्या गाड्या ॲम्बुलन्स म्हणून वापराव्या अशी मागणी पढेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे यांनी काल दि.१२/०५/२०२१ रोजी केली होती.
त्या पार्श्वभुमीवर आज दि.१३/०५/२०२१ रोजी खासदार लोखंडे यांच्या बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करुन धक्काबुक्की केली म्हणुन खासदार लोखंडे याचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल विनोद उंडे यांच्या तक्रारीवरुन पढेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे व चार अनोळखी व्यक्तीं विरुध्द भा .दं.वि .कलम ३५३,१४३,१४७,४५२,३३२, ५०४ ,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनास्थळाची श्रीरामपूर डीवायएसपी श्री.संदीप मिटके यांनी भेट देवुन पाहणी केली आहे.
परंतू हा गुन्हा उदय लिप्टे यांनी खासदारांकडे ॲब्युलन्स ची मागणी केली म्हणुन राजकीय दबावातुन दाखल करण्यात आला,असे गंभीर गुन्हे दाखल करुन तरुण सामाजिक कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे सतंप्त ग्रामस्थ व नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोरोना महामारीत ॲब्युलन्स अभावी लोक मरत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणुन ॲब्युलन्स ची मागणी केली. लोकप्रतिनिधींकडे मागणी नाही करणार तर कोणाकडे करणार ? खासदारांकडे ॲम्बयुलन्स ची मागणी करणे म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा होतो का ? असा सतंप्त सवाल पढेगाव-उंबरगाव-बेलापूर पंचक्रोशीतले ग्रामस्थ करत आहेत.