शिवप्रहार न्यूज -बेलापुरात बलात्कार;व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी....

बेलापुरात बलात्कार;व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी....
श्रीरामपूर -तालुक्यातील बेलापूर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच मोबाईल मध्ये चित्रीकरण केले याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रोहित शाम भिंगारदिवे,राहणार -राजवाडा ,बेलापूर ,वय २१ याला पोलिसांनी अटक केली आहे.
भादंवि कलम 376 सह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पिडीत ही अल्पवयीन मुलगी असल्याचे माहीत असतानाही तिच्याशी प्रेम संबंध करण्याचे नाटक करून तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच बळजबरीने अत्याचार देखील केला. त्याचे चित्रीकरण मोबाईल मध्ये करून ते व्हायरल करण्याची धमकी आरोपी हा डिसेंबर २०२० पासून आज पर्यंत पीडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आई-वडिलांना देत होता.
त्यामुळे पीडित मुलगी व तिच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस उपनिरीक्षक श्री.कृष्णा घायवट हे करीत आहेत.