शिवप्रहार न्यूज - थत्ते ग्राउंडवर मोबाईल चोरणारा 12 तासात पकडला; मोबाईल हस्तगत

थत्ते ग्राउंडवर मोबाईल चोरणारा 12 तासात पकडला; मोबाईल हस्तगत
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील थत्ते ग्राउंडवर फिरायला आलेल्या विलास रामभाऊ जराड यांचा मोबाईल सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी शर्टाच्या वरच्या खिशातून चोरून नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत भादवि कलम 379 प्रमाणे गुरनं 195/2023 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त माहिती मिळाली की, श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 1 भागात राहणारा फारुक दस्तगिर शेख वय-42 याने हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी फारूक याचा शोध घेऊन त्याला अटक केली. फारूक शेखकडून जराड यांचा पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचे आदेशाने तपास पथकातील सपोनि व्ही. एम. पाटील, पोना रघुवीर कारखेले, पो.ना. शरद वांढेकर, पो. कॉ. गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो. कॉ. मच्छिंद्र कातखडे, पो.कॉ. गौरव दुर्गुळे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पो.ना.फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी केली असून, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ए.पी.पटेल हे करीत आहेत.