शिवप्रहार न्यूज- “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या आमरण उपोषणाला नगराध्यक्षा अदिक यांची भेट…

शिवप्रहार न्यूज- “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या आमरण उपोषणाला नगराध्यक्षा अदिक यांची भेट…

“शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडी”च्या आमरण उपोषणाला नगराध्यक्षा अदिक यांची भेट…

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीने” पुकारलेल्या आमरण उपोषणाला आज चौथ्या दिवशी दुपारच्या सुमारास श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांनी भेट दिली. यावेळी नगराध्यक्षांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली व प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी असे मत मांडले.

          तसेच अवैध धंद्यांच्या विरोधातील या आमरण उपोषणाला त्यांनी जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. आज इतरही अनेक मान्यवरांनी तसेच सर्वसामान्य श्रीरामपुरकरांनी “शिवप्रहार प्रतिष्ठान युवा आघाडीचे” उपोषणकर्ते चंद्रशेखर(चंदू) आगे,योगेश सोनार व दीपक संत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.